पेठ–सातगाव पठार परिसरातील संशयास्पद वास्तव्यासंदर्भात प्रशासनाने सखोल चौकशी करावी

[ngd-single-post-view]

पेठ, ता. आंबेगाव, जि. पुणे : पेठ गाव व सातगाव पठार परिसरात बाहेरील देशातून आलेल्या काही व्यक्ती वास्तव्यास असल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यामध्ये काही व्यक्ती बांगलादेशातून आलेल्या असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, संबंधित व्यक्तींचे नागरिकत्व, ओळख व वास्तव्याची प्रशासनामार्फत सखोल पडताळणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या व्यक्तींकडे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, रहिवासी दाखले किंवा अन्य शासकीय कागदपत्रे असल्यास ही कागदपत्रे कोणत्या प्रक्रियेतून मिळाली, त्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करण्यात आली आणि त्यांची सत्यता काय आहे, याची चौकशी संबंधित प्रशासनाने करावी.

बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांचाही शोध घ्यावा

जर चौकशीमध्ये कोणतीही कागदपत्रे बनावट, खोटी किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आल्याचे सिद्ध झाले, तर केवळ ती कागदपत्रे वापरणाऱ्या व्यक्तींवरच नव्हे, तर बनावट कागदपत्रे तयार करणारे, उपलब्ध करून देणारे, मध्यस्थी करणारे किंवा शासकीय प्रक्रियेत गैरप्रकार करणारे संबंधित व्यक्ती कोण आहेत, याचाही तपास करण्यात यावा.

“बनावट कागदपत्रे कोणी तयार करून दिली? ती तयार करण्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे कुठून मिळाली? कोणत्या व्यक्ती किंवा एजंटने त्यांना मदत केली? संबंधित कागदपत्रे कोणत्या कार्यालयातून किंवा प्रक्रियेतून जारी झाली?” या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी.

सोशल मीडिया व इतर माध्यमांवर या विषयासंदर्भातील काही व्हिडिओ प्रसारित झाल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, अशा व्हिडिओंची सत्यता, संबंधित व्यक्तींची ओळख आणि त्यातील दाव्यांची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे.

ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पेठ व सातगाव पठार परिसरात वास्तव्यास असलेल्या संशयास्पद व्यक्तींची कायदेशीर ओळख व नागरिकत्व तपासणी करून, परदेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


Websites Views :

page counter