माहिती अधिकार कायद्याला वन उपवनसंरक्षक जुन्नर वन विभागा कडून कराची टोपली.माहीती अधिकार कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार 

[ngd-single-post-view]

जुन्नर वन विभागामध्ये माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली देण्याचा प्रकार घडत असल्याचं सातत्याने दिसत आहे उपवनसंरक्षक जुन्नर वन विभाग या कार्यालयामध्ये माहिती अधिकार अर्ज केल्यास चुकीची उत्तरे व आपल्या अधिकारी देखील बाजूनेच निकाल देण्याचा केविलोना प्रकार घडत आहे.अपील अधिकारी कोणत्याही प्रकारे माहिती अधिकार कायद्याचे पालन न करता जाणून बुजून वेळ मारून नेत आहेत. असे दिसते जुन्नर वन विभागातील जी जे सुराडकर हे कार्यालयीन अधीक्षक असून त्यांच्याकडे दोन वर्षांमध्ये जे दोन अर्ज सेम प्रकारे करण्यात आले त्या दोन अर्जाना सुराडकर यांनी दोन वेगवेगळी उत्तर दिलेले आहेत. परंतु अपील अधिकारी यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे त्यांच्या बाजूनेच निकाल देण्यात आलेला आहे. अर्जदाराने वारंवार हेच दाखवून देऊन सुद्धा अपील अधिकारी यांनी एकतर्फी निकाल दिल्याने आता ह्या बाबतीत अर्जदार योगेश लंगे यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. सुरडकर यांनी गेल्या वर्षीच अर्जदार योगेश लंगे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रकार के़ला . शिवीगाळ करणे उघडे नागडे करून गावात हिंडवणे असे सुराडकर बोलुन देखील भ्रष्टाचाराने व साखळीने पद्धतीने पोखरलेल्या वनविभाग मात्र मुग गिळुन गप्प आहे. सुराडकर यानी फोन करून त्यांना बोलल्याचं कॉल रेकॉर्डिंग आहे. पुरावे असुन ही वन विभाग कारवाई करत नाही.असे अर्जदार योगेश लंगे यांनी सांगितलं ओतुर विभागातील अधिकारी ठोकळ यांना देखील माहिती पंधरा दिवसात देण्याचे आदेश असून देखील आज एक महिना झाला परंतु माहिती देण्यात आलेली नाही. माहिती देण्याचा टाळणं हा कायद्याने गुन्हा आहे असं हायकोर्टाने नमूद केलेल्या असून देखील जन माहिती अधिकारी हे माहिती देण्याचे टाळत आहेत. सुरडकर यांनी जवळपास एक लाख 70 हजार वर रक्कम कळवले आहे कोणत्याही प्रकारे मुद्द्यांचे विश्लेषण पानांची प्रकार न कळवता अंदाजपंचे रक्कम कळून देखील अपीली अधिकारी यांनी त्यांना पाठीशी घातलेले दिसत आहे. याबाबत कायदेशीर जाणार असल्याचे व सुरडकर वर गुन्हा दाखल करत असल्यास त्यांनी सांगितलं. माहिती मागायला गेल्यावर सरकारी कामात अडथळा आणले असे खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार माहिती अधिकार कार्यकर्त्यांना दबाव निर्माण करण्याचा प्रकार फॉरेस्ट विभाग करत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश लघे यांनी केला. या बाबतीत वन मंत्री यांची भेट घेऊन सादर प्रकार सांगणार आहे असे त्यांनी सांगितलं. अन्यथा. नागपूर या ठिकाणी वन विभाग कार्यालय मध्ये जाऊन आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.. 


Websites Views :

page counter