दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ, खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेधाचे पत्र…

[ngd-single-post-view]

राजगुरुनगर : काश्मीर, पहलगाम येथे पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ, खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करीत प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकावर झालेला दहशतवादी हल्ला, पाक पुरस्कृत भ्याड स्वरूपाचा हल्ला असून मानवतेला काळिमा फासणाऱ्या या हल्यात अनेक निरपराध पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला.ही घटना अतिशय निंदनीय असून दहशतवाद रोखणे, अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढणे अत्यावश्यक असून अशा घटनेचा पत्रकार संघ निषेध करीत असून दहशतवाद्यांना खतपाणी घालून पोसणाऱ्या ला कडक कारवाई करण्यात यावी. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय शेटे, कार्याध्यक्ष रोहिदास घाडगे, सचिव किरण खुडे, माजी अध्यक्ष सुनील थिगळे, बाळासाहेब सांडभोर, महेंद्र शिंदे, अशोक कडलक, अॅड, निलेश आंधळे, नाजीम इनामदार, अशोक कोरडे, रवी कोरडे आदी पत्रकार उपस्थित होते.


Websites Views :

page counter