[ngd-single-post-view]
- राजगुरुनगर : भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवान महावीर जन्मकल्याणक दिनाचे स्वागत जैन बांधवांकडून गरबा खेळत करण्यात आले. सकाळी ९ ते ४ यावेळेत आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ संचलित जैन धर्मार्थ हॉस्पिटल च्यावतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आले. जागृती महिला मंडळ व जैन सकल संघातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त प्रसाद वाटप करण्यात आले. श्री अरिहंत नागरी पतसंस्थेच्या वतीने कार्यक्रमानंतर सर्वांच्या गौतमप्रसादीचे आयोजन करण्यात आले होते.
- यावेळी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष मनीष बोरा, श्री मुनीसुव्रत स्वामी जैन श्वेतांबर ट्रस्ट चे अध्यक्ष संजय राठोड, पु. प्रमोदसुधाजी म. सा. चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष बोथरा, सचिव प्रशांत कर्नावट, अरिहंत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सुशील शिंगवी, उपाध्यक्ष पायल ओसवाल, जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष विजय भनसाळी, लालचंद कर्नावट, माजी अध्यक्ष फुलचंद ओसवाल, माजी सरपंच शांताराम बापू घुमटकर, माजी सरपंच प्रदीप कासवा, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक समीर आहेर, नगरसेवक किशोर ओसवाल, सुरेखा क्षोत्रीय, चैतन्य संस्थेच्या सुधाताई कोठारी उपस्थित होते.
- रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी जैन श्रावक संघाचे संचालक अमर टाटीया, किशोर कर्नावट, नीलम मुथा, दिनेश बलदोटा, महेंद्र गुगलिया, सागर बलदोटा, भूषण दुगड, कमलेश पोखर्ना, प्रतीक रूनवाल, सौरभ लुनावत, विशाल कासवा, विपुल कर्नावट तसेच जैन सकल संघाच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. चाकण ब्लड बँकेचे संचालक आकाश जगताप यांचे सहकार्य लाभले.