खासदार Nilesh Lanke यांची प्रकृती खालावली; उपचारासाठी पुण्यात हलवले

[ngd-single-post-view]

अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॅशिंग खासदार Nilesh Lanke यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांच्यावर अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्याचा सल्ला दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार लंके यांना गेल्या काही दिवसांपासून शारीरिक थकवा आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवत होता. स्थानिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीतील गुंतागुंत लक्षात घेता अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी त्यांना पुण्यातील प्रसिद्ध Ruby Hall Clinic येथे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांना पुण्याकडे हलवण्यात आले.

खासदार निलेश लंके यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समोर येताच अहिल्यानगर जिल्ह्यासह त्यांच्या मतदारसंघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.

सतत जनतेमध्ये सक्रिय राहणारे आणि विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे खासदार लंके यांना डॉक्टरांनी काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, रुग्णालयाकडून अद्याप अधिकृत वैद्यकीय बुलेटिन जारी करण्यात आलेले नसले तरी त्यांच्या प्रकृतीत स्थिरता असल्याची प्राथमिक माहिती निकटवर्तीयांकडून मिळत आहे.


Websites Views :

page counter