खेड तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटी ली. वाकी बुद्रुक ७ संचालकांचा तडकाफडकी राजीनामा..

[ngd-single-post-view]

वैयक्तिक व कौटुंबिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे केले स्पष्ट.. उर्वरित संचालकापैकी देखील राजीनामे होणार ??

चाकण : भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटी लिमिटेड वाकी बुद्रुक मधील सात संचालकांनी आज अचानक सोसायटीचे निबंधक सचिन सरसमकर साहेब यांच्याकडे राजीनामा सोपवला. 

१. विनोद पोपट टोपे 

२. बापू खंडू गारगोटे 

३. ज्ञानेश्वर जयवंत टोपे 

४. चंद्रभागा बबन गारगोटे 

५. सौ. संगीता सुदाम गारगोटे 

६. मारुती भिका गायकवाड 

७. काळूराम नारायण टोपे 

आदि संचालकांनी हा राजीनामा दिला असून राजीनाम्यामध्ये कौटुंबिक व वैयक्तिक कारणामुळे तसेच वेळ देऊ शकत नसल्यामुळे सदरचा राजीनामा देत असल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे.

याबाबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सोसायटीचे संचालक विनोद उर्फ पप्पू दादा टोपे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी गावात शांतता प्रस्थापित होण्याच्या अनुषंगाने तसेच गावातील राजकारण थांबण्यासाठी सदरचा निर्णय घेतला असून यापुढे देखील अधिक संचालक राजीनामा देण्याची शक्यता आहे असे पुणे ब्रेकिंग न्यूज शी बोलताना सांगितले.

१३ संचालक असलेल्या या सोसायटीतील अजून किती संचालक राजीनामे देणार हे आता पहावे लागणार आहे ? या राजीनामा नाट्यावर कधी पडदा पडणार हे पाहण्यासाठी अनेकांची उत्सुकता शिगेला गेलेली आहे.


Websites Views :

page counter