“प्रतिनिधी- योगेश लंघे पाटील
टाकळी हाजी, 30 मे 2025 – आज सकाळी 10 वाजता टाकळी हाजी ग्रामपंचायतीमध्ये महा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत, पोलीस बंदोबस्ताच्या छायेत अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने महत्त्वपूर्ण हिंदुत्ववादी ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
ग्रामसभेत मंजूर ठरावाचे चार ठळक मुद्दे:
१.प्रार्थनास्थळ उभारणे आणि भरवण्यावर बंदी:
ग्रामपंचायतीच्या अधिकृत परवानगीशिवाय गावात कोणत्याही प्रकारचे धार्मिक प्रार्थनास्थळ उभारता किंवा त्यामध्ये प्रार्थना भरवता येणार नाही. कोणतीही धार्मिक सभा किंवा धार्मिक क्रियाकलाप यासाठी परवानगी आवश्यक आहे.
२.अनधिकृत धर्मांतरणावर कारवाई:
प्रलोभन देऊन धर्मांतरण घडवणाऱ्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर तात्काळ कारवाई करून ती स्थळे जमिंदोस्त करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
३.गावाबाहेरील अपप्रचार करणाऱ्यांवर बंदी:
ग्रामपंचायत क्षेत्राबाहेरील व्यक्तींनी गावात येऊन कोणत्याही धर्माचा अपप्रचार केल्यास गावबंदी करण्यात येईल.
४.आरक्षणाचा अपवापर थांबवण्यासाठी निर्णय:
हिंदू धर्मात जन्म घेऊन इतर परधर्मीय प्रार्थना करताना किंवा धर्मप्रचार करताना आढळल्यास, अशा व्यक्तींचे आरक्षण तत्काळ रद्द करावे आणि शासकीय योजनांचा लाभ बंद करावा.
ग्रामस्थांचा निर्धार – “गाव तितका हिंदुत्वाचा बुरूज”
ग्रामस्थांनी सांगितले की हे ठराव कोणत्याही धर्मविरोधासाठी नसून, गावातील शांतता, संस्कृती आणि सामाजिक एकता टिकवण्यासाठी आवश्यक आहेत. ही ऐतिहासिक ग्रामसभा इतर गावांसाठीही एक प्रेरणादायक उदाहरण ठरली आहे.