राजगुरुनगर : 231 आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिनांक : १७/३/२५ रोजी माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या तक्रारीनुसार खेड तालुक्यातील भामाआसखेड बिगर सिंचन आरक्षण असलेले धरण असून या धरणातून पुणे मनपा,चाकण,पिंपरी चिंचवड सह 19 गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजना सुरू आहेत.
सदर धरण क्षेत्रासाठी गट नंबर ५९,६१,६२ मधील ५ हे ३८ क्षेत्र संपादित केलेले असून पुणे महानगरपालिकेने जॅकवेल साठी 23 आर क्षेत्र खरेदी केलेले आहे. तसेच याच गट नंबर मधील ५ हेक्टर ३ आर क्षेत्रामध्ये इलेगंट वॉटर फ्रंट रिसॉर्ट हे सुरू असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगी न घेता हे रिसॉर्ट सुरू आहे तसेच रिसॉर्ट मालकाने धरण क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून धरणाच्या पुढील क्षेत्रात दगड माती मुरूम यांचा भराव करून रिसॉर्टचा विस्तार केला आहे. जो बेकायदेशीर असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
भामा आसखेड धरण हे फक्त पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असून त्यामध्ये रिसॉर्टचे सांडपाणी सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचत आहे. तसेच याची रिसॉर्ट मध्ये अनाधिकृत हेलिपॅड असून,धरणांमध्ये अनाधिकृत बोटिंग सुद्धा या दिसत कडून केली जाते. त्या जलसंपदा विभाग अथवा आवश्यक परवानगी घेतले गेले नाहीत. रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामामुळे धरणाला धोका निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी भामासखेड धरण क्षेत्रात अनाधिकृत बांधकाम करून बेकायदेशीर सुरू असलेले इलेगंट वॉटर फ्रंट रिसॉर्ट वर कारवाई करणे बाबत संबंधितांना आदेशित करावे. अशी तक्रार दाखल करण्यात आलेली असून त्यावर कारवाई करणेबाबतचे पत्र दिनांक : ३/४/२०२५ रोजी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी उपजिल्हाधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सहाय्यक अभियंता भामाआसखेड, करंजविहिरे, तहसीलदार,खेड यांना दिलेले असून त्यानुसार वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने स्थळ पाहणी करून स्वयं स्पष्ट अभिप्रायाने अहवाल विनाविलंब सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आता पुढील काळात सुरेश आण्णा धस यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील या बहुचर्चित रिसॉर्ट चे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
याबाबत शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले.