[ngd-single-post-view]
प्रशांत बेडसे पाटील 2.0 ची सुरुवात….. खेड तालुक्यातील सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या तहसीलदार पदाच्या खुर्चीवर अखेर पुन्हा एकदा प्रशांत बेडसे यांची वर्णी…!!
राजगुरुनगर : तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी मॅच तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय येथे दिलेल्या न्यायालयीन लढ्यानंतर पुन्हा एकदा त्यांची खेड तहसील कार्यालयात नियुक्ती झाली आहे.
आज सायंकाळी त्यांनी त्यांचा कार्यभार स्वीकारला आहे. गेली अनेक दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तहसीलदार पदाच्या खुर्चीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रशांत बेडसे यांची नियुक्ती झाल्याने उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी केली आहे.