[ngd-single-post-view]
राजगुरुनगर : राजगुरुनगर नगर परिषदेच्या करवाढीबाबत समस्त ग्रामस्थांच्या पाठिंबावर दीपक थिगळे यांनी उपोषण आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. गेल्या तीन दिवसापासून दीपक थिगळे पंचायत समिती आवारात उपोषणाला बसले आहेत. त्यांना शहरातून कमालीचा पाठिंबा मिळत आहे.
आज खेड आळंदी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार बाबाजी काळे यांनी हा विषय विधानसभेत लावून धरला. त्यानंतर मंत्री शंभूराजे देसाई यांनी अहवाल घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
मात्र जोपर्यंत काही कागदावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण आंदोलनावर ठाम असल्याचे आंदोलक दीपक थीगळे यांनी सांगितले आहे.
दीपक थीगळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी लवकरच सर्व वरिष्ठ ज्येष्ठ मंडळींना विचारात घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असे सांगितले आहे.