राजगुरुनगर : पुण्यातील राजगुरुनगर येथे खुल्या व पंधरा वर्षाखालील गटांची बुद्धिबळांची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत राज्यभरातील जवळपास 300 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत 60 हजार रुपयांची बक्षिसे व चषक याची कमाई विविध स्पर्धकांनी केली. विशेष म्हणजे क्राऊन चेस अकॅडमी तर्फे पंधरा वर्षाखालील गटातील प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना चषकांचे वाटप करण्यात आले.या स्पर्धेत विविध क्षेत्रातील मान्यवर, बुद्धिबळप्रेमींनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव श्री राजेंद्र कोंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी एडवोकेट पद्माकर साळवे जयवंत पिंगळे कृषी अधिकारी फले जेष्ठ पत्रकार रामचंद्र सोनवणे भगतसर उपस्थित होते.
स्पर्धा सुरू असताना खेडचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे, ऍडव्होकेट संदीप घुले,एडवोकेट माणिक वायाळ तसेच संदीप पिंगळे यांनी भेटी दिल्या.
खुल्या गटात ओम नागनाथ लंकाने याने 6.5 गुण मिळवून तर 15 वर्षाखालील गटात संकेलच्या जीनम यांनी प्रथम पारितोषिक मिळवले.बक्षीस समारंभ शिवशंभू छावा संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट निलेश आंधळे, शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भरतशेठ पवळे, संपादक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 चे मनोहर गोरगले तथा संस्थापक सचिव शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, सचिन भाऊ राक्षे, कार्याध्यक्ष शिवशंभू छावा प्रतिष्टान महाराष्ट्र राज्य, दत्ताभाऊ टाकळकर, पुणे जिल्हा अध्यक्ष, रेणुकाताई मासेकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा, शशिकलाताई थोरात पुणे जिल्हा उपअध्यक्षा तसेच संघटनेच्या विविध पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन नियोजन हे क्राऊन अकॅडमी संचालक दीपक गायकवाड दिनेश भारसाकडे गणेश फलके डॉक्टर ऋषिकेश ठोंबरे व मंगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
दिपक गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.