आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील प्रियकराने पोखरी मधील प्रियसीचे कोयत्याने केलं शीर धडावेगळं… कोयत्याने वार करत प्रेयसीचं शीर धडावेगळ केलं…

[ngd-single-post-view]

आंबेगाव (मंचर ): पुणे जिल्ह्यातून फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगलामध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद झाला आणि चिडलेल्या प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचे शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने स्वतःहून पोलिसांसमोर जाऊन खुनाची माहिती दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मधील वांबोरी परिसरातील (ता. राहुरी) विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ बुधवारी (ता. 19) ही घटना घडली आहे. सोनाली राजू जाधव (वय 28, रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. सखाराम धोंडिबा वालकोळी (वय 58, रा. निडगुरसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील निकम यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सखाराम हा प्रेयसी सोनालीसोबत बुधवारी (ता. 19) सायंकाळी सातच्या सुमारास वांबोरी परिसरातील पिलेश्वर देवस्थान मंदिर परिसरात गेले होते. यावेळी प्रेयसी सोनाली ही आरोपी सखारामकडे पैशाची मागणी करू लागली. ‘मला पैसे दे नाहीतर मी पोलिसात तक्रार करीन,’ असे ती म्हणात होती, त्यावरून सोनाली व सखाराम यांच्यात वाद झाला. त्यानंतर सखारामने सोनाली हिच्या मानेवर कोयत्याने वार केला, यामध्ये तिचा मृत्यू झाला. कोयत्याचा वार इतका जोरात होता, त्यामुळे सोनालीचे शीर धडावेगळे झाले. त्यानंतर आरोपी सखाराम वार केलेला कोयता घेऊन जवळपास चार किलोमीटर अंतर चालत रात्री दहाच्या सुमारास वांबोरी पोलिस दूरक्षेत्रात पोहोचला. तेथे त्याने स्वतःच फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. ‘मी माझी प्रेयसी सोनालीला ठार मारले आहे,’ असे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी सोनाली हिचा मृतदेह पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वांबोरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे वांबोरी परिसरात खळबळ उडाली आहे. बाहेरगावावरून आरोपी त्या ठिकाणी का आला होता? त्याने आपल्या प्रेयसीची हत्या नेमकी कोणत्या कारणावरून केली? फक्त पैशावरून वाद होता का? तो वांबोरीपर्यंत कोणत्या वाहनाने आला? या बाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
या प्रकरणामुळे आंबेगाव तालुक्यात खळबळ पसरली असून उलट सुलट चर्चा ना वेग आला आहे.


Websites Views :

page counter