नाशिक शहर पोलिस नारायणगावात बांगलादेशी घुसखोरांचे ‘नारायणगाव कनेक्शन’….. नारायणगावातून बांगलादेशी घुसखोरांना वारंवार होते मदत… ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचा संशय…???

[ngd-single-post-view]

नारायणगाव : नाशिक आडगाव परिसरातून आठ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आल्यानंतर यातील तिघांकडे नारायणगावातील, ता. जुन्नर, जि.पुणे रहिवासाचा पुरावा आढळून आला आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीने सदरील रहिवाशाचा पुरावा दिल्यासंदर्भात शहर पोलिसांच्या पथकाने नारायणगाव गाठल्याचे समजते. परंतु नेमकी कोणाची चौकशी केली वा आणखी किती घुसखोरांना रहिवाशाचा पुरावा देण्यात आला, याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, शहर-जिल्ह्यात आणखीही बांगलादेशी घुसखोर असण्याच्या शक्यतेनुसार गोपनीय तपास सुरू आहे.

 

याबाबत दूतावासाशी संपर्क करून

शेख सुमन कालाम गाझी (वय (२३), आसाद अर्शद अली मुल्ला २७), अब्दुला अलीम मंडल (३०), आलीम सुआनखान मंडल (३०), शाहीन मफिजुल मंडल (३२), अलअमीन आमीनूर (२३), लासेल नुरअली शंतर (२२), मोसीन मौफीजुल मुल्ला असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशीं ची नावे आहेत.सध्या सर्व रा. सागर बंगला, वरचा मजला, आडगावातील एका नामांकित बांधकामाच्या ठिकाणी मजुरी एका पथकाने ग्रामपंचायतीमार्फत धात्रक फाटा, आडगाव शिवार, करणाऱ्या आठ बांगलादेशी रहिवाशाचा सर्व मूळ रा. बैताडीगाव, घुसखोरांना बुधवारी (ता. ५) असता अद्याप शातखिरा, राज्य खुलना, मध्यरात्री शहर गुन्हे शाखेच्या असे अटक करण्यात पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांमधील तिघांकडे नारायणगाव ग्रामपंचायतिचे रहिवासी पुरावे मिळाले आहेत. या संशयितांच्याबाबत रहिवाशाचा पुरावा नारायणगाव येथे जाऊन चौकशी करण्यात आलेली नाही. याबाबात पोलीस प्रशासन कमालीची गुप्तता पाळत आहे.

जसे अमेरिकेत अवैधरीत्या शिरलेल्या भारतीयांना ज्याप्रमाणे भारतात परत पाठविण्यात आले, त्याच धर्तीवर बांगलादेशी घुसखोरांना परत बांगलादेशात पाठविण्यासंदर्भात बांगलादेशी दूतावासाशी संपर्क साधून त्यानुसार पोलिसांकडून प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे सूत्रांची माहिती आहे.

 

 

 

 


Websites Views :

page counter