. २४ ते २६ मार्च २०२५ दरम्यान क्रिडा व युवक सेवा संचालनालाय, महाराष्ट्र राज्य पुणे व स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय,अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे *राज्यस्तरीय शालेय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग कुस्ती स्पर्धा-२०२५* ह्या आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
या स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील ७ मल्लांनी पुणे विभागाचे नेतृत्व करत आपला सहभाग नोंदवला होता. आणि विशेष अभिमानास्पद बाब म्हणजे या सर्वच मल्लांनी उत्कृष्ट अशा खेळाचे प्रदर्शन करुन दैदिप्यमान कामगिरी करत *तब्बल ६ सुवर्ण पदके 🥇व १ रौप्यपदक🥈* पटकावून घवघवीत असे ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
त्याचबरोबर या सर्व पदक विजेत्या मल्लांची *१ ते ४ मे २०२५ रोजी जयपूर (राजस्थान) या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी* निवड झालेली आहे.
स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू :-
१) पै. कार्तिक चव्हाण – ४० किलो 🥇
२) पै. श्रावण गायकवाड -४५ किलो 🥇
३) पै. प्रविण संगमनेरे – ६० किलो 🥇
४) पै. यश जामदार – ६५ किलो 🥇
५) पै. समर्थ खेतमालीस -७१ किलो 🥇
६) पै. सिद्धेश पाटील- ८६ किलो 🥇
७) पै. शंतनू सोलवनकर – ८० किलो🥈
या सर्व पदक विजेत्या मल्लांना प.पू.सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा-आशिर्वादासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण चे अध्यक्ष मा.नंदकुमार सूर्यवंशी (साहेब) आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक,राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार विजेते गुरुवर्य वस्ताद मा.पै.भरत नायकल (सर) आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पै.विवेक नायकल,NIS कुस्ती कोच पै.राजेंद्र पाटील,NIS कुस्ती कोच पै.अक्षय डांगे तसेच आत्मा मालिक क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक मा.साईनाथ वरपे सर यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभलेले आहे.
या सर्व पदक विजेत्या मल्लांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.. 🥳🥳💐💐
*आत्मा मालिक..!*