टाकळी हाजी -शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील उचाळेवस्ती भागात राहणाऱ्या नागरिकाने सात जणांविरुद्ध जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली आहे.
फिर्यादी राहुल मारुती गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांच्या घरी येऊन बायबल वाचण्यास व ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. “तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा, आम्ही आर्थिक मदत करू” असे आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच, हिंदू धर्मातील देव-देवतांविषयी अवमानकारक वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात प्रशांत जालिंदर घोडे (रा. टाकळी हाजी), मोजस बार्बनबस डेव्हिड (वय ४८, रा. नागपूर), अमोल विठ्ठलराव गायकवाड (वय ४२, रा. नागपूर), योगेश संभुदेल रक्षत (वय ३७, रा. नागपूर), जेसी अॅलीस्टर अॅन्थोनी (वय २२, रा. नागपूर), कुणाल जितेश भावणे (वय ३२, रा. आंधळगाव, जि. भंडारा), आणि सिद्धांत सदार कांबळे (वय ३०, रा. केशवनगर, हनुमाननगर, पुणे) या सात जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शिरूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी हाजी पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार हे तपास करत आहेत भोसरी चे आमदार पै महेश दादा लांडगे यांना या बाबतीत रात्री 1 ला कॉल केल्या वर त्यांनी या मध्ये लक्ष घालून कडक कारवाही करावी असे सांगितले… व सातत्याने ते कार्यकर्तेन सोबत संपर्कात होते…. असे बजरंग दलाचे योगेश लंघे यांनी सांगितले…
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत कारवाई केली असून, याबाबत ग्रामस्थांनी शांतता राखून पोलिस आणि प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, जेणेकरून सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था टिकवता येईल.”..प्रशांत ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी
हिंदू धर्म जागरण विभाग शिरूर आंबेगाव तालुका यांनी देखील या बाबतीत कडक भूमिका घेतली असून. झाल्या ल्या प्रकरणावर बारकाईने लक्ष असल्याचे त्यांनी म्हंटले
शिरूर तालुक्यात धर्मांतर करण्याचा प्रकार अविरतपणे सुरू आहे. नागरिकांनी दक्ष राहावे.कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये. जाणून बुजून नागरिकांना आमिष दाखवून किंवा त्रास देऊन धर्मांतराचे प्रकार घडत असतील तर शिवबा संघटना आणि बजरंग दल शांत बसणार नाही……
(पुणे शिवबा संघटना)
जळजबरी ने धर्मांतर ही बेट भागात खूप गंभीर बाब झाली आहे. या कडे प्रशासनाने लक्ष द्यावे. अन्यथा बजरंग दल स्वतःच्या स्टाईल ने उत्तर देईल…..
(बजरंग दल शिरूर ग्रामीण)