(आळेफाटा) पुणे : खाकीचे स्वप्न अधुरेच; अकॅडमी शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने उचलले टोकाचे
पुणे: पोलीस दलात भरती होऊन देशसेवेचे आणि कुटुंबाचे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्दीने तयारी करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीचा आळेफाटा येथे 10 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. खासगी अकॅडमीतील शिक्षकाकडून सातत्याने मानसिक आणि अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला .
भाग्यश्री भास्कर भंडारी असे मृत तरुणीचे नाव आहे. ती मूळची आळकुटी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथील रहिवासी होती आणि आळेफाटा येथे राहून भरतीची तयारी करत होती.
करण्यात आलेल्या आरोपानुसार, सह्याद्री अकॅडमीतील शिक्षक मयुर अशोक डुंबरे (Mayur Ashok Dumbre) यांनी एका पूर्वीच्या घटनेनंतर भाग्यश्रीला कथितरित्या लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. वर्गात तसेच इतर वारंवार अपमान करणे आणि मानसिक त्रास देणे सुरू असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
भाग्यश्रीची बहीण शितल भंडारी, या शासकीय सेवेत कार्यरत आहेत. घटनेनंतर त्यांनी आळेफाटा पोलिसांकडे फिर्याद दिली.
आधारे पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
खासगी अकॅडमींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
घटनेनंतर आळेफाटा परिसरातील खासगी अकॅडमींच्या कार्यपद्धतीबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
भागातील हजारो तरुण-तरुणी पोलीस आणि इतर सरकारी भरतीसाठी अकॅडमींमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे शिस्तीच्या नावाखाली कथित मानसिक किंवा सार्वजनिक अपमान होऊ नये यासाठी कडक नियमावली, तक्रार यंत्रणा आणि प्रशासनाची नियमित देखरेख असावी, अशी मागणी होत आहे.



