ब्रेकिंग न्यूज | जुन्नर शिवजन्मभूमी जुन्नर शहरात घरात ३ गायी कापलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

[ngd-single-post-view]

ब्रेकिंग न्यूज | जुन्नर

शिवजन्मभूमी जुन्नर शहरात घरात ३ गायी कापलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे सुमारे २.३० वाजता कसाब गल्ली परिसरात गोवंश कत्तलीची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. छाप्यात एका घरामध्ये ३ गायी कापलेल्या अवस्थेत आढळून आल्या. घटनास्थळी कातडी काढलेले अवयव तसेच कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारेही जप्त करण्यात आली.

पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे जुन्नर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाशी निगडित भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून संबंधित नेटवर्कचा तपास केला जात आहे.

 


Websites Views :

page counter