पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचा पिस्तूलधार्यांना दणका.पंधरा शस्त्र परवाने रद्द…

[ngd-single-post-view]

पिंपरी : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी माजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ जणांचे पिस्तुल परवाने रद्द केले आहेत. शस्त्राचा दुरुपयो विविध गुन्ह्यांतील सहभाग, मंजुरीनंतर मुदतीत शस्त्र खरेदी न करणे तसेच वृद्धत्व किंवा मृत्यू झाल्याच्या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

 

याशिवाय, नवीन शस्त्र परवाना मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या ६८ जणांचे अर्जही फेटाळण्यात आले आहेत. संबंधित अर्जदारांकडे शस्त्र परवाना देण्यासाठी आवश्यक आणि सबळ कारणे नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, मयूर भोईर, सुभाष सपकाळ, विजय लांडे, साहिल ढमाले आणि शांताराम चव्हाण या पाच परवानाधारकांवर शस्त्राचा दुरुपयोग केल्याचे तसेच विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले.पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत हे आरोप सि‍ झाल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले.

 

तसेच मंजुरी मिळाल्यानंतरही विहित कालावधीत शस्त्र खरेदी न करणाऱ्या व्यक्तींचे परवाने रद्द करण्यात आले. याशिवाय वृद्धत्व आलेले किंवा मृत्यू झालेल्या आठ परवानाधारकांचे परवानेही रद्द करण्यात आले. त्यामुळे एकूण रद्द झालेल्या शस्त्र परवान्यांची संख्या १५ वर पोहोचली आहे.

 

नवीन शस्त्र परवान्यासाठी आलेल्या अर्जांचीही सखोल छाननी करण्यात आली. यामध्ये ६८ अर्जदारांकडे शस्त्र बाळगण्याची आवश्यक गरज किंवा पुरे कारण नसल्याचे आढळल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले.

 

शस्त्र परवान्यांच्या बाबतीत पोलीस आयुक्तालयाने कठोर धोरण स्वीकारले आहे. शस्र देण्यासाठी आवश्यक आणि सबळ कारणे नसल्याचे चौकशीत आढळून आले.

 

 

रद्द करण्यात आलेल्या परवानाधारकांमध्ये विजय लांडे यांचा समावेश असून ते तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी स्वीकृत नगरसेवक होते.ही कारवाई केवळ प्रशासकीय निकषांच्या आधारे करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


Websites Views :

page counter