अक्षय प-हाड यांच्या माध्यमातून ३९७ राजगुरूनगरकरांची आरोग्यवारी

[ngd-single-post-view]

अक्षय प-हाड यांच्या माध्यमातून ३९७ राजगुरूनगरकरांची आरोग्यवारी

 

राजगुरुनगर, दि. १५ एप्रिल २०२६ (बुधवार): अरींजय फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. अक्षय प-हाड यांच्या पुढाकारातून व अनुलोमच्या सहकार्याने राजगुरुनगर शहरातील सर्व नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर तसेच शासकीय योजना नोंदणी शिबिर यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले.

 

सकाळी ९ वाजण्यापूर्वीच शिबिराच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. दिवसभर चाललेल्या या शिबिराची सांगता सायंकाळी ७ वाजता करण्यात आली. संपूर्ण दिवसात नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

या शिबिरामध्ये महिलांसाठी मेमोग्राफी (स्तन कर्करोग तपासणी) तसेच सर्व नागरिकांसाठी ब्लड प्रेशर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, सीबीसी, रक्तगट तपासणी अशा विविध १० हजार रुपये किमतीच्या आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण ३९७ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

 

तसेच, नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय योजनांची नोंदणी देखील करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे नियोजन अनुलोमचे जनसेवक श्री. मयूर भगत, सिद्धेश लोहोट, प्रेम गायकवाड, सिद्धेश भोसले, आदेश कुंभार, अथर्व गावडे यांनी अचूकरीत्या पार पाडले.

 

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष श्री. मंगेश गुंडाळ, किरण आहेर, शिवाजी मांदळे, सुरेश कौदरे, सरपंच नरेंद्र वाळुंज, अरुण गुंडाळ, नगरसेवक नीलेश घुमटकर, राहुल पिंगळे, आशा गुंडाळ, प्रेम जगताप, महिला मोर्चाच्या अध्यक्षा रचना फसाटे, गजानन पाठक, ओंकार सोनार, मयूर सावंत, रवी वाडेकर, पत्रकार सूरज वाडेकर, नितीन शहा, प्रतीक दौंडकर, कैलास दुधाळे यांसह अनेक मान्यवर व सहकारी उपस्थित होते.

 

यावेळी अरींजय फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. अक्षय प-हाड यांनी सांगितले की, “राजगुरुनगरकरांच्या हितासाठी येणाऱ्या काळात विविध विषयांवर अधिकाधिक जनहिताची कामे राबविण्यात येतील.”

या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्य तपासणीबरोबरच शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्याने सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.


Websites Views :

page counter