विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गावाहीनी आंबेगाव तालुका यांच्या वतीने मंचर येथे हिंदू नववर्षा निमित्त भव्य शोभायात्रा 

[ngd-single-post-view]

प्रतिनिधी- वैभव काळे पाटील (आंबेगाव तालुका)

हिंदू नववर्ष गुढीपाडवा या निमित्ताने काल चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७ रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मंचर प्रखंड व सर्व संलग्न संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या हिंदू नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

शोभायात्रेत सुमारे २५हजार हिंदू बांधव आणि भगिनींची उपस्थिती होती. 

सायंकाळी ५ वाजता बाजार पेठेतील श्रीराम मंदिर येथून शोभायात्रेला सुरुवात झाली श्रीराम मंदिरात म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, भाजप तालुकाध्यक्ष संदीप बाणखेले, किसान मोर्चाचे संजय थोरात विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संतोष खामकर, मंचरचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ साहेब यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. 

महाआरती संपन्न झाल्यावर परंपरेनुसार ध्वजपूजन व शस्त्र पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. 

शोभायात्रेच्या अग्रभागी धर्म ध्वज त्या मागे घोडे, उंट सहभागी झाले होते त्यावर विराजमान छत्रपती श्री शिवाजी महाराज, शंभूराजे, मावळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते हिंदू धर्मात सगळ्यात आधी पूजेचा मान असणाऱ्या श्री गणरायाचा चित्ररथ, भगवान शंकरांचा चित्ररथ, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांची पूर्णाकृती मूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णाकृती मूर्ती आणि संविधान चित्ररथ, बाल वानर सेना, बजरंग बली हनुमानाची आकर्षक मूर्ती, धर्मवीर चंद्रशेखर अण्णांचा स्मृतीरथ, अदीयोगी चित्ररथ लक्षानीय होते. त्याच बरोबर सुमारे ५००वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम मंदिर उभं राहिलं त्या मंदिरात विराजमान असणाऱ्या श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. गो मातेचा चित्ररथ, श्रीरामांच्या मूर्ती समोर आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या छत्र्या उठून दिसत होत्या, कळवण नाशिक आणि माळीण या भागातून आलेले आदिवासी बांधनी सादर केलेली पारंपरिक नृत्यकला, संस्कृती कार्यक्रम तसेच शोभायात्रेत ठिकठिकाणी रौद्र शंभु मर्दानी खेळ विकास मंच च्या कार्यकर्त्यांनी केलेले मर्दानी खेळ सादर केले, यावर्षी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली ध.चंद्रशेखर (आण्णा) बाणखेले मार्गावर उभी केलेली ३५ फूट उंच स्वागत कमान, संपूर्ण मार्गावर केलेली विद्युत रोषणाई, पुणे-नाशिक महामामार्गावरील राममंदिर या विषयावरील स्वागत कमान आकर्षणाचा विषय ठरले, 

नारायणगाव येथील वीरोबा ढोल ताशा पथक सहभागी झाले होते, 

शोभायात्रा श्रीराम मंदिर, चावडी चौक, ध. संभाजी महाराज चौक, पुणे- नाशिक महामार्ग, ध.चंद्रशेखर (आण्णा) मार्ग येथून येऊन छ. श्री शिवाजी महाराज चौकात भव्य सांगता सभा संपन्न झाली. या सांगता सभेच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून कडवट हिंदुत्ववादी वक्त्या काजल दीदी हिंदुस्तानी उपस्थित होत्या, या शोभायात्रेत प्रामुख्याने दुर्गावाहिनीच्या मुलींचा सहभाग उल्लेखनिय होता, सुमारे १०० मुली पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून शोभयात्रेत सहभागी झाल्या होत्या, शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येण्याअगोदर चौकातील भव्य व्यासपीठावर महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला, शोभयात्रेत राजश्री भागवत या महिला रांगोळी कलाकाराने संपूर्ण शोभायात्रा मार्गावर हाताने रांगोळी काढली, 

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मूर्तीला फुलांची आकर्षक सजावट, मित्र सागर पेट्रोल पंपापासून चौकाच्या दोन्ही बाजूला केलेली विद्युत रोषणाई नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होते, शोभायात्रेमुळे मंचर आणि पंचक्रोशीला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शोभयात्रेत भोसरीचे दमदार आमदार महेशदादा लांडगे यांनी सहभागी होऊन स्वतः घोषणा देऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला प्रमुख वक्त्यांनी हिंदू धर्म, संस्कृती, लव जिहाद, लँड जिहाद, इतिहास, हिंदू धार्मियांवर होत असलेले हल्ले, हिंदू मुलींना कशा पद्धतीने जिहादी मानसिकता असणारी मुले प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच धर्मांतरण करतात, त्यांच्यावर बलात्कार करून त्यांचे तुकडे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले जातात, त्यामुळे हिंदू मुली, त्यांचे आई-वडील यांनी सतर्क राहने किती गरजेचे आहे, आपली मुलगी कोणाला भेटते तिचे मित्र- मैत्रिणी कोण आहेत हे पाहायला हवं, हिंदूंच्या पवित्र स्थळांवर जिहादी लोकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहेत, हिंदूंच्या अनेक व्यवसाय जिहादी लोकांनी गिळंकृत केले आहेत त्यासाठी हिंदूंनी जागरूक असणे गरजेचे आहे असे परखड मत वक्त्यांनी व्यक्त केले 

या शोभायात्रेत प्रमुख उपस्थिती विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत निधी प्रमुख धनाजी मामा शिंदे, प्रांत बजरंग दल सहसंयोजक संदेशभाऊ भेगडे, 

भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष प्रशांत काळे, उपाध्यक्षा डॉ.रश्मीताई घोलप, जिल्हा मातृशक्ती संयोजिका वैशालीताई लांडगे, सहसंयोजिका मनीषा चासकर, जिल्हा मंत्री संतोष खामकर, प्रखंड अध्यक्ष गणेश गाडे, इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शोभायात्रेचे नियोजन प्रतीक बाणखेले, साई गुंजाळ, यश काळे, किरण चव्हाण, पार्थ चासकर, अक्षय रेनके, आदेश शेटे, रुपेश लोखंडे, सुजल बाणखेले, चैतन्य आर्वीकर, ऋषिकेश सोमवंशी, बाबू देठे, यश तोत्रे, सौरभ सोमवंशी, सार्थक कराळे, सारंग खानदेशे, संस्कार बाणखेले, प्रतीक मोरडे, सिद्धेश बाणखेले यांनी केले तर सूत्रसंचालन हेमंत लोखंडे यांनी केले

Websites Views :

page counter