इंदापूर येथील बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा 4 जणांवर गुन्हा दाखल… 4 जण फरार

[ngd-single-post-view]

इंदापूर येथील बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा 4 जणांवर गुन्हा दाखल… 4 जण फरार प्रशासनाचा कारवाई चा फार्स उघड, जिल्हाधिकारी कार्यालयाने मोहीम राबवून पण छुप्या पद्धतीने गोवांशाची कत्तल 2,000 टन गोमांस जप्त -अर्धवट कापलेल्या अवस्थेतील गाई व वासरांचे अवयव  1 लाख 31 हजाराचे मुद्देमाल जप्त…

 

इंदापूर येथील तरंगवडी भागात गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल होतेय अशी खात्रीलायक माहिती मिळताच उपविभागीय अधीक्षक कार्यालय व इंदापूर पोलीस स्टेशनच्या मदतीने ही कारवाई करण्यात यावेळी छापा होताच 4 आरोपी धारदार शस्त्राने कत्तल करताना सापडले व 4 जन अंधाराचा फायदा घेत फरार झाले झाले यावेळी घनदाट झुडपाच्या आत जाताच तेथे गायी वासरे अर्धवट कापलेल्या अवस्थेतील मोठे तुकडे गोमांस, धारदार हत्यारे, कातडी, मुंडके पाय व पोते , ड्रम भरून गोमांस मोठ्या प्रमाणावर आढळुन आले व 2 दुचाकी जप्त करण्यात आली तसेच

4 खाटकांवर व गोतस्करांवर व ईतरावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सर्व गोमांस विश्लेषण करुन नमुने तपासून पाठवुन गोमांस डिसपोज करण्यात आले आरोपी पुढिलप्रमाणे

1) आरीफ यासीन कुरेशी (वय 55 रा इंदापूर) 2) एम डी युनुस (वय 53 रा.इंदापूर ), 3)मोहसीन गुलाबनबी सय्यद ( वय 36 रा बारामती पुणे) 4)अब्दुल रज्जाक रफिक कुरेशी वय 41 रा इंदापूर व इतर 4 जणांच्या विरोधात भा. द. वि कलम 429,34, महाराष्ट्र प्राणी संरक्षन (सुधारणा) अधिनियम 1995चे कलम , 5(ब), 7,9,(ब), 11व प्राण्यांना निदयतेने वागविने प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 (ड) (च) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे वाहने व मुद्देमाल जप्त केला असून गोमांस डिस्पोज केले असून इंदापूर भागात मध्ये बंद पत्र्याच्या शेडमध्ये गायीं वासरांची कत्तल मोठ्या प्रमाणात केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने पोलिसांच्या मदतीने भारतीय जीव जंतू कल्याण बोर्ड चे अधिकारी निखील दरेकर, मंगेश चीमकर ,शरद गाडे , अहिरेश्र्वर जगताप, विकास शेंडगे, शादाब मुलाणी यांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकला. पुढिल तपास इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, पोलीस उपनिरीक्षक महेश बरड करत आहेत छापा झाल्याने काही काळ झटापट झाल्याने तणाव व निर्माण झाला होता पोलीसांनी योग्य प्रकारे परिस्थीती नियंत्रणात आणली इंदापूर येथे नुकताच प्रशासनाने धडक मोहीम राबवून कत्तलखाने उध्वस्त केले होते कारवाई होताच छुप्या पद्धतीने पुन्हा कत्तलखाने व गोतस्कर सक्रिय झाले असुन तडीपार कारवाई प्रलंबीत असलेने मुख्य आरोपी मोकाट असुन त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.


Websites Views :

page counter