सप्त हिंदकेसरी बैलगाडा शौकीन यांच्या गळ्यातील ताईत स्व.मन्याभाई च्या दशक्रियेच्या दिवशी मोठी घोषणा होणार… ५० हजारांच्या वर मन्या प्रेमी येण्याची शक्यता..

[ngd-single-post-view]

सप्त हिंदकेसरी बैलगाडा शौकीन यांच्या गळ्यातील ताईत स्व.मन्याभाई च्या दशक्रियेच्या दिवशी मोठी घोषणा होणार… ५० हजारांच्या वर मन्या प्रेमी येण्याची शक्यता..

वाफगाव : सप्त हिंदकेसरी,फायनल सम्राट, रेकॉर्ड ब्रेकर अशा अनेक पदव्यांनी ज्या मन्याला बैलगाडा शौकीनांनी डोक्यावर घेतले. तो मण्याभाई आज आपल्यातून निघून गेला आहे. त्याचा दशक्रिया विधी त्याचे मालक रॉबिनहूड दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस राजू शेठ जवळेकर यांच्या गोठ्यावर दिनांक.६/३/२०२४ रोजी ठेवण्यात आलेला आहे.मन्याचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच त्याचा पूर्णाकृती पुतळा बांधण्याचा निर्णय सभापती राजूशेठ जवळेकर यांनी घेतला. 

स्वर्गीय मन्या भाई नाव ऐकल्यावर अंगावर काटा आजपण येतो. वादळा सारखा वेग. कधीही कोणाला इजा न‌ करणारा. बैलगाडा शर्यतिचा वाघ बैलगाड्यामधील सेलिब्रिटी. जर मन्याभाई कोणत्या घाटात असेल तर अक्षरशः घाटात मुंगी सुद्धा जाऊ शकत नाही येवढा जन समुदाय. परंतु वादळ शांत झालेले आहे. हे वादळ १८ वर्ष अविरतपणे पुणे जिल्ह्यामध्ये, तसेच अखंड महाराष्ट्रात घोंगावत होते .तरुणाईतील जीवाचे काळीज सप्तहिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, भारत केसरी,साहेब केसरी, प्रथम हिंदकेसरी असे एक ना अनेक किताब “मन्याभाई” च्या नावावर आहेत. सभापती राजूशेठ जवळेकर यांचे बैलगाडा शर्यत चालू करण्यामध्ये मोलाचे योगदान आहे. ते बैलगाडा शर्यत म्हणून जगतात पूर्ण आयुष्य त्यांनी बैलगाडा शर्यतीसाठी घालवले आहे. त्यांच्या दावणीला असलेला अत्यंत लाडाचा असा हा मन्याभाई, मन्याभाई जर घाटात आला अक्षरशः घाट तुडुंब भरायचा.  मन्या ला भाई हे नाव पुणे ब्रेकिंग न्युज ने पाडले. तेव्हा पासून मन्या चा भाई झाला. पहिल्या वर्षी पुणे ब्रेकिंग न्यूज ने ९५% बैलगाडा शर्यत लाईव्ह कव्हरेज केली. त्यावेळेस मन्या ज्या घाटात असेल त्या घाटात अक्षरशः गर्दीचा महापुर असायचा .हे ह्याची डोळा पुणे ब्रेकिंग न्यूज प्रत्येक घाटात पहिले. लाईव्हला पाहणाऱ्यांची संख्या तर लाखोच्या घरात असायची. इतकी लोकप्रियता कोणत्याही शर्यतीच्या बैलाला नसावी. अशी अफाट लोकप्रियता मन्याभाई ची होती. आज मन्या भाई आपल्यातून गेला तरुण मुले,वयस्कर व्यक्ती,बैलगाडा मालक असे अनेक जणांचे डोळे पाणवले. दिनांक ६ मार्च रोजी मन्या भाईची दशक्रिया वापगाव येथील त्यांच्या गोठ्यावर ठेवण्यात आली आहे.मन्या भाई चे मालक सभापती राजू शेठ जवळेकर यांनी पोटच्या मुला सारखे मन्या भाई ला संभाळले. अख्खी रात्र एकाच जागे वर‌ बसुन काढली. बंदीच्या काळात. तळहाताच्या फोडा प्रमाणे जपले. राजु शेठ जवळेकर यांचे बंधु बाळासाहेब (भाऊ )जवळेकर यांनी देखील बैलगाडा शर्यतला आयुष्य समर्पित केले आहे. असे सर्व काही असताना बैलगाडा शर्यत प्रेमी बैलगाडा वरचा जीव, बैलावरची माया, या मुळे भाऊनी कसलाही विचार केला नाही. मन्याभाई गेल्या पासून भाऊचे वजन उतरल्या सारखे आज जाणवले.प्रत्येक घाटात भाऊ चा जोश असायचा.. पोटतिडकीने धावपळ करणारे भाऊ आज शांत- शांत होते. एकटेच जाऊन तिथे मन्याभाई ला बांधले जायचे त्या जागेवर ते जायचे. डोळे भरुन यायचे. पण आपले तसेच परत समाधी स्थळावर जायचे.. त्यांचा जीव कासावीस होत होता.. माझा मन्या भाई इथेच आहे कुठे तरी असे भास होत होते.

आज मन्या भाई नाही पण आठवणी मात्र अश्या आहेत की बस झाले. खुप प्रसिद्धी, खुप पारोतिषीक, खुप काही दिले व आज मन्या म्हणजे कुटुंबातील सदस्य महादेवाच्या पिंडी समोर असलेला नंदी, महादेवाच्या पिंडी समोरील नंदी काढून टाकला की कसे वाटेल ? अगदी तसेच मन्या आमच्यातुन निघून गेल्यानंतर वाटते असे भावनिक उदगार बाळासाहेब जवळेकर यांनी काढले.

मन्या च्या दशक्रियेची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.५० हजार लोकांना बसण्याची व्यवस्था, जेवण पाणी सर्व काही केले आहे याचे लाईव्ह कव्हरेज आपण पुणे ब्रेकिंग न्यूज वर पाहू शकता. त्यातच मन्या भाईच्या दशक्रियाच्या दिवशी सभापती राजू शेठ जवळेकर एक मोठी घोषणा करणार असल्याचे समजत आहे आता ही मोठी घोषणा काय हे दशक्रिया च्या दिवशीच आपल्याला समजेल.


Websites Views :

page counter