दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गुरुवारी रात्री विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. महाविद्यालयात सर्वसाधारण सभा सुरू असताना ही घटना घडली. या घटनेनंतर अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही हाणामारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन यांच्यासह डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये गुरुवारी रात्री झाली. या हल्ल्यात ३ विद्यार्थी जखमी झाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना समोर आली आहे. वास्तविक, गुरुवारी रात्री प्रतिनिधी निवडीसाठी सर्वसाधारण सभा सुरू होती. या बैठकीदरम्यान काही विद्यार्थ्यांनी अभाविपच्या उमेदवाराला मंचावरून बोलू दिले नाही, असं सांगण्यात येत आहे. यावरून विद्यार्थ्यांच्या गटात बाचाबाची होऊन विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या घटनेत अभाविप आणि इतर विद्यार्थ्यांनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले आहेत. विरुद्ध पक्षातील विद्यार्थ्यांनी याला अभाविपच्या विद्यार्थ्यांची गुंडगिरी म्हणत अभाविपच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर लाठीमार केल्याचं सांगितले. त्याचवेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित विद्यार्थी याला डाव्या विचारसरणीचा हल्ला म्हणत आहेत. लोकशाहीच्या गप्पा मारणारे डावे कम्युनिस्ट,उजवे विचार ऐकू शकत नाहीत,भाषण करण्यास मज्जाव करतात ही त्यांच्याच विचारांशी प्रतारणा नाही का ?? असा प्रश्न सर्व सामन्यातून उपस्थीत होत आहे.
JNU विद्यापीठात पुन्हा एकदा ABVP आणि AISA विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांत राडा… सततच्या हिंसाचाराच्या घटनांनी विद्यापीठ दणाणले….
[ngd-single-post-view]