सविंदणे येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल;

[ngd-single-post-view]

शिरूर : सविंदणे, ता. शिरूर परिसरात महिलेचा विनयभंग करून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 806/2026 नुसार आरोपी सुभाष नाथा कामठे, रा. कामठेवाडी, सविंदणे, ता. शिरूर, जि. पुणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 75, 78, 79, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी l पडवळ यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्या आपल्या पती व दोन मुलांसह सविंदणे येथे राहत असून शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पतीचे व आरोपीच्या संबंधित व्यक्तीचे जमिनीच्या प्रकरणावरून पुणे येथील न्यायालयात प्रकरण सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, सुमारे दीड वर्षापूर्वी आरोपी घराजवळ आला असता त्याने फिर्यादीशी अश्लील वर्तन करून “मुला खूप आवडतेस, मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत,” अशा स्वरूपाचे अश्लील बोलणे केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतरही आरोपीकडून त्रास देण्याचा प्रकार सुरू राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपी मोटारसायकलवरून फिर्यादीच्या घराजवळून जाताना वारंवार पाहत असल्याचे तसेच त्याच्या या वागण्यामुळे फिर्यादीला मानसिक त्रास होत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5.42 वाजता माहिती प्राप्त झाल्याची नोंद असून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.


Websites Views :

page counter