चाकण : चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सन्माननीय निलेशदादा बबनराव टिळेकर यांची, तर व्हाईस चेअरमनपदी सौ. साधनाताई दिपकबापू गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी एकमताने निर्णय घेण्यात आल्याने निलेशदादा टिळेकर आणि साधनाताई गोरे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या सभासद व हितचिंतकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या नेतृत्वाखाली चाकण नागरी सहकारी पतसंस्थेची प्रगती अधिक गतिमान होऊन सभासदांच्या हिताला प्राधान्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
निलेशदादा बबनराव टिळेकर व सौ. साधनाताई दिपकबापू गोरे यांचे बिनविरोध निवडीबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! त्यांच्या पुढील सामाजिक, सहकारी व सार्वजनिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा!



