मंचर पोलीस ठाण्यातील लोकप्रिय अधिकारी सुनील बडगुजर यांना PI पदावर बढती

[ngd-single-post-view]

 

मंचर, ता. ९ श्री योगेश लंघे पाटील (प्रतिनिधी):

मंचर पोलीस ठाण्यात आपल्या कार्यशैलीने आणि जनसंपर्काने विशेष ठसा उमटवणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सुनील बडगुजर यांना राज्य शासनाकडून पोलीस निरीक्षक (PI) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने ९ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती नाशिक परिक्षेत्रातील नंदुरबार जिल्ह्यात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२-न अन्वये पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ मार्फत राज्यातील एकूण २०१ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या प्रक्रियेत सन २०२४-२५ च्या निवडसूचीतील पात्र अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, न्यायालयीन याचिका आणि प्रशासकीय नियमांच्या अधीन राहून हे आदेश देण्यात आले आहेत.

🔹 लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी

सुनील बडगुजर यांनी मंचर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवत अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावला. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि लोकांशी सातत्याने संवाद ठेवणे या गुणांमुळे त्यांनी आंबेगाव तालुक्यात अल्पावधीतच मोठा नावलौकिक मिळवला होता.

शासनाच्या निर्णयानुसार, पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार किंवा उपलब्ध रिक्त पदांनुसार नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. बडगुजर यांची आता नाशिक परिक्षेत्रात वर्णी लागली असून, नंदुरबारसारख्या संवेदनशील जिल्ह्यात ते पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावणार आहेत.

👉 त्यांच्या पदोन्नतीबद्दल मंचर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Websites Views :

page counter