[ngd-single-post-view]
किवळे (प्रतिनिधी):
किवळे येथील घाटेवस्ती परिसरात आज भीषण रस्ते अपघात घडून एका तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. नवनाथ दशरथ म्हसे (वय अंदाजे —, रा. किवळे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घाटेवस्ती परिसरात XUV कार आणि स्प्लेंडर दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार नवनाथ म्हसे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.



