तालुका पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार अजित दादा पवार यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन…

[ngd-single-post-view]

राजगुरुनगर (वार्ताहर):- खेड तालुका पञकार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी व पुणे जिल्हाचे पालकमंञी यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

आज सकाळी नऊ वाजता मा.अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मुत्यु झाला अजितदादा च्या या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला एक सच्या,परखड व्यक्तिमत्व असलेला सच्या नेता महाराष्ट्र हरपल्याने महाराष्ट्रच्या राजकारणात व समाजकारणात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली.खेड तालुका पञकार संघाच्या वतीने खेड पंचायत समितीच्या आवारातील पञकार संघाच्या कार्यालयात आज सायंकाळी सहा वाजता अजितदादा ना भावपुर्ण श्रद्धांजलि अर्पन करण्यात आली. यावेळी खेड तालुका पञकार संघाचे अध्यक्ष निलेश आंधळे,माजी अध्यक्ष महेंद्र शिंदे,बाळासाहेब सांडभोर,सुनिल थिगळे,किरण खुडे,राजेद्र लोथे,रामचंद्र सोनवणे,नाजीम. इनामदार,प्रभाकर जाधव,आशोक कोरडे,व पञकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Websites Views :

page counter