अपक्ष उमेदवार रुपाली नवनाथ ढोमे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत डॉ सुभाष पोकळे यांना पाठिंबा

[ngd-single-post-view]

प्रतिनिधी- योगेश लंघे पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद निवडणुकीत महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. चालू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत पक्षीय समन्वय व रणनीतीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार रुपाली नवनाथ ढोमे यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या माघारी घेतला आहे. त्यांनी **शिवसेना व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार डॉ. सुभाष पोकळे यांना जाहीर पाठिंबा देत एकजुटीचे संकेत दिले आहेत. या निर्णयामुळे निवडणूक लढतीतील समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या संबंधित गटात चौरंगी लढत पाहायला मिळत असून, निवडणूक अटीतटीची बनली आहे. प्रत्येक उमेदवाराकडून जोरदार तयारी सुरू असून प्रचाराला वेग आला आहे. या चुरशीच्या लढतीत अखेर कोण बाजी मारणार, याकडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, अपक्ष उमेदवाराची माघार आणि अधिकृत उमेदवाराला मिळालेला जाहीर पाठिंबा हा निर्णायक ठरू शकतो. आगामी काही दिवसांत प्रचाराच्या रणधुमाळीत आणखी घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मतदारांमध्येही या निर्णयाची चर्चा रंगताना दिसत आहे.


Websites Views :

page counter