केंद्र लोणावळे यांच्यावतीने गरीब,गरजू,अनाथ,आदिवासी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

[ngd-single-post-view]

केंद्र लोणावळे यांच्यावतीने गरीब,गरजू,अनाथ,आदिवासी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

चाकण- प्रतिनिधी परिसरातील,काळूस,पिंपरी,वाकी,रोहकल,रासे,भोसे,वडगाव घेनंद,बिरदवडी,आंबेठाण,करंजविहीरे,गडद,वांद्रे, सायगाव जऊळके आणि चाकण व सर्व वाड्या अशाा एकुण 42 शाळांमधील 500 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला.यामध्ये वह्या,कंपास, पेन,पाट्या,प्रयत्नरहस्य पुस्तक असे साहित्य वाटप करण्यात आले.मनशक्तीचे समन्वयक प्रा.चिंतामण शिवेकर यांनी ही माहिती दिली.

मनशक्तीचे ज्योतीताई अरगडे (माजी उपसभापती) मोहन पवार, सुभद्रा तापकीर, सुदाम ठोंबरे ,द्वारकाताई परदेशी, बाळासाहेब नाणेकर,काळूराम शिंदे, नितीन ठोंबरे,सुनिल बनकर,उज्वला शिवेकर,वंदना भोर,प्रा.अंकुश सावंत,केशव आरगडे,सुनील नाणेकर,सचिन उटे यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष संजय बोरकर, अंकुश सांडभोर,प्रा.धनंजय भांडवलकर,प्रा.सुवर्णा वाळुंज, चेअरमन शिवेकर,सरपंच अक्षय शिवेकर, यशवंत शिवेकर,व उपसरपंच आनंद साकोरे, सचिन शिवेकर शिवेकर,हभप तुकाराम गडदे, मनोहर शिवेकर,अविनाश शिवेकर,गणपत पोटवडे सर,संदीप कोळेकर सर,दिलीप करंडे सर,रामदास शिवेकर सर, नारायण करपे सर,विक्रम लाडसर,शिवाजी थिटे सर,दत्ता लिंभोरे, राखी परदेशी यांच्यासह अनेक ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक उपस्थित होते.

यासाठी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे,प्रल्हाद बापर्डेकर,मधूकर संधान,अजित फापाळे,सुनिल बनकर, प्रा.सुभद्रा तापकीर,प्रा.चिंतामण शिवेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रास्ताविक प्राचार्य धनंजय भांडवलकर,सुत्रसंचालन प्रा.शंकर साळूंके, आभार प्रा.दत्तात्रय आडवळे
यांनी मानले.


Websites Views :

page counter