आईनेच घेतला 11 महिन्याच्या मुलाचा जीव

[ngd-single-post-view]

 शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात घडलेल्या एका अमानुष आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आईच्या कुशीत सुरक्षित असणाऱ्या ११ महिन्यांच्या निष्पाप बालकाचा स्वतःच्या आईकडून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात रवींद्र अशोक पवार (रा. भांबर्डे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नी पूजा रवींद्र पवार हिने स्वतःच्या पोटच्या मुलाचा खून केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे “आई” या पवित्र नात्यालाच काळिमा फासल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

‘अडथळा’ वाटल्याने घेतला टोकाचा निर्णय

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कोकणातील मुरुड येथून फिरून आल्यानंतर मुलगा यश सतत रडत होता. तसेच “मुलगा असल्यामुळे दुसरे लग्न होणार नाही” या विकृत विचारातून आरोपीने हा थरारक निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

हत्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

आरोपीने आपल्या ११ महिन्यांच्या मुलाचे डोके घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा जीव घेतला. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी रक्ताचे डाग धुऊन टाकले. मृतदेह कपड्यांच्या बॅगेत ठेवून त्यात दगड टाकले आणि ती बॅग शेतातील विहिरीत फेकून दिली.

या घटनेने संपूर्ण शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

समाजात खळबळ

या अमानुष घटनेमुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, अशा विकृत मानसिकतेवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

#shirur #breakingnews #crime #pune


Websites Views :

page counter