मंचर येथे तरुणाचा खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

[ngd-single-post-view]

 

मंचर (प्रतिनिधी): योगेश लंघे पाटील 

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४३ वर्षीय व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. सोमनाथ कर्णराज गायकवाड असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अशोक दशरथ धोत्रे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना देवकी प्लाझा इमारतीतील शासनमान्य देशी दारूच्या दुकानासमोर घडली. या प्रकरणी मयूर संतोष गायकवाड (वय २८, रा. सुलतानपूर रोड, गांजाळेमळा, मंचर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी अशोक दशरथ धोत्रे (रा. जुना बैलबाजार, बाणखेलेमळा, मंचर) याने फिर्यादीचे चुलते सोमनाथ गायकवाड यांना मारहाण केली. या मारहाणीत सोमनाथ गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व तपासाच्या आधारे त्याला पाथर्डी (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली आहे.

टीप: वरील फोटो हे घटनास्थळ/पोलिस कारवाईचे प्रातिनिधिक (AI/स्टॉक) दृश्य आहेत. 


Websites Views :

page counter