शिरूर तालुक्यात लग्नाच्या पैशावरून वाद; आठ जणांविरुद्ध अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल

[ngd-single-post-view]

प्रतिनिधी -योगेश लंघे पाटील 

शिरूर : शिरूर तालुक्यातील कोकडेवाडी, न्हावरा परिसरात मुलीच्या लग्नाच्या पैशाच्या कारणावरून वाद होऊन एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला व अपहरण झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 128/2026 नुसार भा.न्या.सं.का.क 118(1), 137(2), 189(2), 191(2), 190, 351(2)(3), 352, 191(3) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी अकी रितील चव्हाण (वय 30, व्यवसाय मजुरी), मूळ रा. केडगाव, दुधसागर (जि. अहमदनगर) सध्या रा. कोकडेवाडी, न्हावरा (ता. शिरूर, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, दि. 13/02/2026 रोजी रात्री सुमारे 9.15 वाजता कोकडेवाडी, न्हावरा येथे आरोपी प्रदीप संदिप भोसले, रमजान खुट्या काळे, सुरेश जाटला काळे, कुणाल सुरेश काळे, ताई सुरेश काळे, गणीता रमजान काळे, गणेश ढोल्या चव्हाण व शिवा संदिप चव्हाण (सर्व रा. जि. अहमदनगर) हे तीन दुचाकींवर येऊन फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांशी मुलीच्या लग्नाच्या पैशाच्या कारणावरून वाद घालू लागले. आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच लोखंडी गज, लाकडी काठ्या, चाकू व कोयत्यासारख्या हत्यारांनी मारहाण करून फिर्यादीसह इतरांना दुखापत केली. यावेळी फिर्यादीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घेऊन गेल्याचा आरोप आहे.

या घटनेची नोंद दि. 15/02/2026 रोजी दुपारी 3.06 वाजता करण्यात आली. प्रकरणाचा तपास पो.हवा. शिंदे (व. नं. 2498) करीत असून, गुन्हा नोंदणीची कारवाई पो.हवा. जाधव (व. नं. 222) यांनी केली आहे. प्रभारी अधिकारी पो.नि. केंजळे, शिरूर पोलीस स्टेशन आहेत.


Websites Views :

page counter