खेड तालुक्यातील दावडी गावचे युवकांचे नेतृत्व करणारे भुषण श्री किरण लोणकर यांची छावा मराठा सेना पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड शिवजन्मभूमी नारायणगाव येथील छावा मराठा संघटनेच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात करण्यात आली.
यावेळी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल भोर”, नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबुभाई पाटे”, छावा महिला संघटना केंद्रीय अध्यक्ष प्रियांका ताई भोर”, केंद्रीय अध्यक्ष डॉ. मनोज तळेकर”, तसेच खेड तालुक्यातील काळेवाडीचे सरपंच वैभव सातकर” यांच्या हस्ते किरण लोणकर यांना नियुक्तीपत्र व शिवप्रतिमा प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास खेड तालुक्यातील अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष किरण लोणकर यांचे अभिनंदन केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थापक अध्यक्ष सुनिल भोर यांनी सांगितले की, “किरण लोणकर हे युवकांचे संघटन मजबूत करणारे सक्षम नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर सरपंच वैभव सातकर व केंद्रीय अध्यक्ष डॉ. मनोज तळेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
शेवटी नवनियुक्त पुणे जिल्हाध्यक्ष किरण लोणकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “संघटनेची ताकद निश्चितच वाढवली जाईल. या पदाचा उपयोग लोकहितासाठी करून सामाजिक कार्याला अधिक गती देण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता उत्साहात करण्यात आली.
U



