[ngd-single-post-view]
- आळंदी (प्रतिनिधी) : जमीन विक्रीच्या बहाण्याने सुमारे ७ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी Alandi Police Station येथे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १२) करण्यात आली.
- या प्रकरणी दत्तात्रय विश्वनाथ रोडके (रा. धानोरे, ता. खेड), मंदाबाई उर्फ मंदा गौतम गरुड (वय ५७, रा. धानोरे) आणि सोनाबाई शशिकांत सुमुखराव (वय ४५, रा. कळस, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत निलेश भगवान चोडके (वय ४०, रा. बोडकेवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून २०१६ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत धानोरे (ता. खेड) येथे हा प्रकार घडला. आरोपींनी फिर्यादीकडून धनादेशाद्वारे ७ लाख २५ हजार रुपये स्वीकारले. त्याबदल्यात जमीन देण्याचे आश्वासन देत विसार पावती करून दिल्याचे नमूद आहे.
- मात्र, संबंधित जमीन परस्पर दुसऱ्यालाच विक्री केल्याचा आरोप असून, स्वीकारलेली रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
- या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.



