नाना डोळस अखेर निर्दोष मुक्त…  खेड राजगुरुनगर न्यायालयाचा निर्णय.

[ngd-single-post-view]

 

 

राजगुरुनगर :(प्रतिनिधी) दि.१८ सामाजिक कार्यकर्ते व रिपाइं(आठवले) श्रमिक ब्रिगेडचे तत्कालीन खेड तालुकाध्यक्ष व विद्यमान पुणे जिल्हाध्यक्ष संतोष ऊर्फ नाना घन:श्याभ डोळस यांची सन २०२० मधील गुन्ह्यातुन खेड राजगुरुनगर न्यायालयाने अखेर निर्दोष मुक्तता केली 

  आळंदी येथील प्रसिद्ध आश्रमचालिका नियती विकास शिंदे यांच्यासह घरात बरोबर रहाणा-या महीला इसम नामे मिरा आसाराम नागरगोजे यांचे फिर्यादीवरून संतोष ऊर्फ नाना घनःश्याम डोळस यांच्या विरोधात दि. ८ मार्च २०२० मध्य आळंदी पोलीस स्टेशन ता.खेड जिल्हा पुणे येथे दिलेल्या तक्रारीवरून नाना डोळस यांच्यावर आळंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. ५७ / २०२० भा. द. वि. कलम ३५४ , ५०४ , ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेची विविध माध्यमातून जाहीर प्रसिद्धी करण्यात आली होती त्यानंतर न्यायालयाच्या प्रकियेला सामोरय जावून डोळस यांचे मार्फत वकील निलेश आंधळे यांनी जामीन मिळणेसाठी न्यायालयातील कामकाजामध्ये त्यांची बाजू मांडली त्यांनंतर डोळस यांना पंधरा हजारच्या रोखीवर न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता तेंव्हा पासून सदर खटला खेड राजगुरुनगर जिल्हा पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात गेले ४ वर्षे ३ महिने २६ दिवस चालला परंतु सबळ पुरावा सादर करण्यास सरकारी पक्षाला अपयश आल्याने में न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी संतोष ऊर्फ नाना घनःश्याम डोळस यांची सदर गुन्ह्यातील आरोपातून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम २७१ ( १ ) अन्वये निर्दोष मुक्तता केली आरोपीचे या खटल्यातील जामीन बंधपत्र विसर्जित करून जमा असलेली रोख रक्कम सहा महिन्याचे आत परत करून डोळस यांना त्यांच्यावर घेतलेल्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात येत असल्याचे स्पष्ट आदेश में न्यायालयाने दिले आहेत यावेळी सदर खटल्यातील युक्तिवादात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता व्ही. एस. डोळस यांनी कामकाज पाहिले तर आरोपी पक्षातर्फे अँड. ए. जी. किर्लोस्कर यांनी काम पाहिले .


Websites Views :

page counter