पाईट : आडगाव येथील तरुणीत प्रांजल तुकाराम गोपाळे हिचा प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्याने व सुविधा न मिळाल्याने मृत्यू झाले बाबत तक्रार म्हाळुंगे पोलीस स्टेशन येथे नातेवाईकांनी दिली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी कुमारी प्रांजल तुकाराम गोपाळे वय वर्ष १७ राहणार आडगाव तालुका खेड जिल्हा पुणे हिला सकाळी नऊच्या दरम्यान सर्पदंश झाला. तिला प्राथमिक उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाईट येथे आणले असता दवाखान्यात सर्पदंशाची लस तसेच डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचारासाठी चांडोली रुग्णालय येथे देण्यात आले. त्या ठिकाणी देखील लस उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचार करून १०८ रुग्णवाहिकेत प्रांजल हिला पुढील उपचारा कामी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवत असताना रुग्णवाहिकेत कोणताही हॉस्पिटलचा स्टाफ सोबत नव्हता तसेच इतर रुग्णांमध्ये या रुग्णाला देखील नेण्यात आले. प्रांजल हिचा चिखली येथे रुग्णवाहिकेतच दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत प्रांजलच्या कुटुंबीयांशी चर्चा केली असता त्यांनी वरील संपूर्ण माहिती दिली. याबाबत आरोग्य विभागाचे विलास माने (THO) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णाचे नातेवाईक चुकीचे व खोटे आरोप करत आहेत अशी प्रतिक्रिया फोन द्वारे दिली.



