-
घोडेगाव मंचर, दि. १ (प्रतिनिधी) (ता. आंबेगाव) येथे खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी १२ जणांना घोडेगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.गणेश बबन कानिग्ध्वज, किरण सुनील जाधव, धोंडू पांडुरंग बानेरे, नवनाथ खंडू चकवे, सुरेखा संजय धोत्रे, गीता नंदकुमार जगदाळे, सविता भागवत कणसे यांना दि. १३ फेब्रुवारीस अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाअधिकारी घोडेगाव यांनी आरोपींना दि. १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता यातील इतर रोहिदास पंढरीनाथ कुळेकर, सखाराम बबन मराडे, कांताराम सखाराम वाजे, सागर पुनाजी मेमाणे, जालिंदर कान्हू कशाळे यांनाही दि. १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
-
या सर्व आरोपींवर दि. १३ फेब्रुवारी रोजी खवल्या मांजराची तस्करी केल्याबद्दल वन गुन्हा २ / २०२४ मध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियमा २ (१६), ९, ३९,४४, ४९६ (अ), ५०, ५१ अन्वये वनपरिक्षेत्रांम कार्यालय घोडेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील एकूणां १२ आरोपींना न्यायालय यांनी सर्वक आरोपींना दि. १७ फेब्रुवारी रोजी न्यायालयीन कोठडीचा आदेशा केला. या सर्व आरोपींचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडा अधिकारी एम. ए. के. शेख यांच्या न्यायालयात दि. १७ फेब्रुवारीस दाखल केलाई असता आरोपींचा जामीन अर्जी न्यायालयाने मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने ॲड. वैभव राजेंद्र काळे यांनी युक्तिवाद केला वठ कामकाज पाहिले आहे.
खवल्या मांजर तस्करी प्रकरणातील आरोपींची जामिनावर सुटका
[ngd-single-post-view]