शिरूरमध्ये दोन 18 वर्षीय युवती बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

[ngd-single-post-view]

शिरूर : शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील सरदवाडी येथून दोन 18 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीने फूस लावून दोघींना कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 830/2026, भारतीय न्याय संहिता कलम 140(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रेखा मनिष राठोड (वय 42, रा. सरदवाडी, ता. शिरूर) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. 18 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 2.30 वाजण्यापूर्वी त्यांची मुलगी रोशनी मनिष राठोड (वय 18) आणि भाची रूपाली विष्णु राठोड (वय 18) या सरदवाडी येथून बेपत्ता झाल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनी हिने फिकट पिवळ्या रंगाचा टॉप व फिकट निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. तिच्या हातावर ‘विशाल’ नाव गोंदलेले आहे. तर रूपाली हिने पोपटी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगीज परिधान केली होती. तिच्या हातावर ‘धीरज’ नाव गोंदलेले आहे. दोघींची उंची अनुक्रमे सुमारे 5 फूट व 5 फूट 2 इंच असून दोघी मराठी व बंजारी भाषा बोलतात.
घटनेनंतर शिरूर पोलिसांकडून दोन्ही युवतींचा शोध घेण्यासाठी तपास व शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलीस हवालदार कळमकर (2072) हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दाखल अंमलदार : पोलीस हवालदार मोरे (1572)
तपास अधिकारी : पोलीस हवालदार कळमकर (2072)
शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण


Websites Views :

page counter