राजगुरुनगर : उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क व प्रसिद्धी कक्षाच्या वतीने मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जनसंपर्क व प्रसिद्धी कक्षाचे अधिकारी श्री. सुनील भोईर यांनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करताना सांगितले की, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक पात्र मतदाराने कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे त्यांनी नमूद केले.
मतदानाच्या दिवशी सकाळपासून सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून मतदारांनी आपल्या मतदान केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधून स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेतृत्व ठरते. त्यामुळे या निवडणुकीत नागरिकांचा सक्रिय सहभाग लोकशाही अधिक सक्षम व बळकट करणारा ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



