शिरूरमध्ये खंडणीखोराची दहशत: आरएमसी गाड्या अडवून धमकी, चालकाकडून जबरदस्तीने ८ हजार रुपये उकळले

[ngd-single-post-view]

प्रतिनिधी- योगेश लंघे पाटील

शिरूर | प्रतिनिधी

शिरूर शहरातील सोनारआळी परिसरात खंडणीखोर प्रवृत्तीने उच्छाद मांडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिमेंट रस्त्याच्या कामासाठी आलेल्या आरएमसी मिक्सर गाड्या अडवून “मी इथला भाई आहे” अशी दहशत निर्माण करत दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नक्की खंडणी माघनी  झाली की दबाव निर्माण करण्या साठी हा प्रकार झालाय यां बाबतीत आरोपी चे म्हणणे घेतले गेले नाही..  परंतु सरकारी अधिकारी व ठेकेदार यांच्या चुकीच्या कामाला विरोध केला म्हणून पण खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढल्याचे  चित्र सद्या आहे..  जेणे करून केलेल्या भ्रष्टाचार कामाची तपासणी होऊ नये.. अश्या देखील घटना घडल्या मुळे. पोलिसांनी सदर प्रकरणी सखोल तपासणी करणे गरजेचे असल्याचे देखील बोलले जातं आहे.. भ्रष्टाचार लपवन्या साठी देखील खोट्या गुन्ह्याचा सहारा घेतला जात असल्याने. पोलिसांन पुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे…

 

झालेल्या घटने प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 883/2025 अन्वये भा.न्या.सं. कलम 308(5), 308(2), 352, 351(2)(3), 126(2) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी:

संतोष तुकाराम वाखारे (वय ३२), व्यवसाय – शासकीय कंत्राटदार, रा. विठ्ठलनगर, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे.

आरोपी:

अभिषेक उर्फ घ्या मिसाळ, रा. सोनारआळी, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे.

घटना कशी घडली?

दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिरूर शहरातील सोनारआळी परिसरात सिमेंट रस्त्याच्या कामासाठी पाठवण्यात आलेल्या दोन आरएमसी मिक्सर गाड्या आरोपी अभिषेक मिसाळ याने आडविल्या. गाड्यांच्या चाव्या काढून घेत “येथे काम करायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर काम बंद करीन आणि हातपाय तोडीन” अशी धमकी दिली.

इतकेच नव्हे तर आरएमसी गाडीचा चालक अमोल दादाभाऊ भोर याच्या शर्टच्या खिशातून ८ हजार रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले. “हे आजच्या कामासाठीचे पैसे आहेत, उद्या दोन लाख रुपये नाही दिलेत तर गोळ्या घालीन,” अशी भीषण धमकी देत आरोपी घटनास्थळावरून निघून गेला.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिषेक मिसाळ हा सध्या पुणे जिल्ह्यातून तडीपार असल्याचेही समजते, त्यामुळे या घटनेची गंभीरता अधिक वाढली आहे.

पोलीस कारवाई:

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक करांडे यांनी केले आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे शिरूर शहरात खळबळ उडाली असून, खंडणीखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


Websites Views :

page counter