वरुडे येथे धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर; ४० शिवभक्तांचे रक्तदान

[ngd-single-post-view]

खेड : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास तसेच तिथीनुसार छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वरुडे गावात प्रथमच सामाजिक बांधिलकी जपत ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ४० शिव/शंभू भक्तांनी रक्तदान केले, विशेष म्हणजे दोन महिलांनीही रक्तदान करून सहभाग नोंदवला, त्यामुळे या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन बजरंग दल खेड ग्रामीण प्रखंड सहसंयोजक निशांतजी तांबे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सुरज पोखरकर आणि समस्त ग्रामस्थ वरुडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.

या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य निलेश तांबे, तंटामुक्ती अध्यक्ष रविराज तांबे, माजी उपसरपंच रुपेश तांबे, पोलीस पाटील प्रकाश वाघोले, बजरंग दल शाखा अध्यक्ष राजेश तांबे यांच्यासह सुदर्शन तांबे, मारुती पोखरकर, सुजित जगताप, संदेश तांबे, मंगेश मांडले, पंडित पोखरकर, संदीप चौधरी, कानिफनाथ वाघोले, आशिष वाघोले, राहुल तांबे तसेच वरुडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमामुळे समाजात रक्तदानाचे महत्त्व आणि आरोग्य जनजागृतीचा संदेश देण्यात आला.

 


Websites Views :

page counter