प्रतिनिधी- योगेश लंघे पाटील
शिरूर | ता. १४
शिरूर तालुक्यातील कवठे-यमाई गावात बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने घरातील प्रापंचिक साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८७६/२०२५ नुसार बीएनएस कलम ३३१(४), ३३१(३), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विष्णुदास गोपाल मुखेकर (वय ६६ वर्षे, व्यवसाय – निवृत्त पोस्टमास्तर, मूळ रा. कवठेसमाई ता. शिरूर जि. पुणे, सध्या रा. पार्कव्ही सोसायटी, बिल्डिंग एफ-४, फ्लॅट नं. १४, सेक्टर ७, सानपाडा, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.१५ ते ६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.२० वाजेच्या दरम्यान कवठेसमाई येथील त्यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून फोडले. घरात प्रवेश करून चोरट्याने एकूण १७,७६० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.
चोरीस गेलेल्या ऐवजात
एक सॅमसंग कंपनीचा एलसीडी टीव्ही,
महाराजा कंपनीचा मिक्सर,
पाच शर्ट व दोन पॅन्ट,
सहा साड्या,
एक निळ्या रंगाची गळ्यात अडकविण्याची बॅग,
एक ब्लँकेट व एक बेडशीट
यांचा समावेश आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली असून, चोरीस गेलेला ऐवज मिळाल्यास तो ओळखण्याची तयारी फिर्यादीने दर्शवली आहे.
या गुन्ह्याची नोंद ८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजता करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याची कारवाई सफौ साबळे यांनी केली असून, पुढील तपास पोहवा उबाळे (ब.नं. १८९८) करीत आहेत. शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.



