शिरूर पोलीस दलाची उल्लेखनीय कामगिरी.18 गुन्ह्यांचा गुंता सोडवला लाखोच्या चोरीच्या माला सह आरोपी जेरबंद.पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची कामगिरी

[ngd-single-post-view]

दिनांक २०/११/२०२५ रोजी मौजे रामलींग, हत्ती रोड, जाधव मळा, शिरूर ग्रामीण, ता. शिरूर, जि. पुणे येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या–चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ₹२,६०,०००/- किमतीचा मुद्देमाल चोरीस नेला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु.र. क्र. ८२९/२०२५, भा.दं.वि. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे (सो.) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. शुभम चव्हाण व DB पथकाने तत्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व आयकार युनिट, पुणे ग्रामीण येथील संदीप चिर्के यांच्याकडून प्राप्त तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी प्रकाश विलास गायकवाड, रा. रामलिंग रोड, शिरूर याची ओळख पटली.

आरोपी रामलींग परिसरात असल्याची माहिती मिळताच पो.उ.नि. श्री. शुभम चव्हाण व तपास पथकाने कुशाग्र बुद्धीने सापळा रचून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासात आरोपीकडून ₹१,१४,९००/- किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात यश आले.

ही संपूर्ण कारवाई माननीय

पोलीस अधीक्षक श्री. संदीप गिल (सो.)

अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे (सो.)

उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले (सो.)

पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे (सो.)

याच्या सक्षम मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या उल्लेखनीय कामगिरीमध्ये DB पथकातील —पो

.उ.नि. श्री. शुभम चव्हाण,

पोलीस अंमलदार : नितेश थोरात, सचिन भोई, विजय शिंदे, निखील रावडे, अंबादास थोरे, निरज पिसाळ, अजय पाटील,

तसेच संदीप चिर्के (कनिष्ठ तज्ञ, आयकार युनिट, पुणे ग्रामीण)

यांचे विशेष साहाय्य राहिले.

शिरूर पोलीस ठाण्याने अत्यंत तत्परता, तांत्रिक कौशल्य व टीमवर्कच्या जोरावर अल्पावधीत गुन्हा उकल करून पोलीस दलाची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

 

 

 


Websites Views :

page counter