प्रतिनिधी – श्री योगेश लंघे पाटील
आज श्री संत सावतामाळी मंदिरामध्ये श्री क्षेत्र टाळगाव चिखली मधील ग्रामस्थांची मीटिंग पार पडली यामध्ये खऱ्या अर्थाने महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन डीपी जो आलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा त्या ठिकाणी एसएसीसी हे आरक्षण टाकण्यात आलेला आहे एकूण 175 एकरवर त्या आरक्षणामुळे जाधववाडी कुदळवाडी रोकडे वस्ती आहेरवाडी मधील विविध भागातील मूळ शेतकरी हे भूमिहीन होत आहेत आणि म्हणून यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित मिटींग लावून भूमीहिन शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे आणि यासाठी त्यांनी आज भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांना त्या ठिकाणी बोलवलं स्वतः आमदार त्या ठिकाणी आले आणि आमदारांनी आपल्या मनोगतांमध्ये असं सांगितलं की शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या दोन पावलं पुढं असेल हे आरक्षण उठवण्यासंदर्भात मी नक्कीच शेतकऱ्यांना पाहिजे ती मदत करेल आणि भूमीहीन शेतकऱ्यांना पुन्हा त्यात जमिनी रहिवासी झोन मध्ये कशा मिळतील यासाठी प्रयत्न करेल
*यामध्ये मोठ्या प्रमाणात भूमिहीन शेतकरी त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ टाळगाव चिखलीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते*