[ngd-single-post-view]
राजगुरुनगर : दिनांक २९/११/२०२४ सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राक्षवेडी गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवे पुलाखाली सर्विस रोडचे चारीचे कडेला ग्रे रंगाची इनोव्हा गाडी क्रमांक एम एच ०१ एन ए ९४४२ या गाडीतील चालक अज्ञात पळून गेला असून या गाडीत बेकायदेशिर कत्तल केलेले ओबडधोबड आकाराचे जनावरांचे मांस विनापरवाना वाहतूक करताना ईनोव्हा गाडी मिळून आली आहे.
याप्रकरणी पोलिस अंमलदार संकेत संजय कवडे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ क, ९ अ,११ व मोटार वाहन कायदा कलम ८६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणात एकूण ५ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर जाधव हे करत आहेत.



