ब्रेकिंग न्यूज

टायगर ग्रुप चे मुंबई अध्यक्ष संजय भाऊ खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली

18/08/2023 19:15:42  83   ॲड. निलेश आंधळे

चाकण: समाजसेवक संजयभाऊ खंडागळे अध्यक्ष टायगर ग्रुप मुंबई प्रदेश यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधून अनाठायी खर्च टाळून माऊली गोशाळा बिरदवडी येथे चारा वाटप करण्यात आला,त्यावेळी आयोजक सरकार फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष रोहितभाऊ सोनवणे तसेच गोरक्षक खेड प्रमुख बालीशेठ कुलकर्णी ,बहुजन विकास संघाचे अनिलशेठ शिंदे, तुषारभाऊ खंडागळे , माऊली गोशाळा प्रमुख पै. गणेशशेठ हुलावळे ,चाकण प्रमुख कुणालशेठ इंगळे, पै आदेशदादा सोनवणे, विकी सोनवणे, अक्षयशेठ थिगळे,समाजसेविका छायाताई खंडागळे तसेच संपुर्ण बजरंग दलचे खेड तालुक्यातील सर्व गोरक्षक उपस्थित होते. त्यावेळी संजयभाऊंनी गोशाळेच्या कोणत्याही समस्या असल्यास त्याचे निवारण करु असे आश्वासन दिले, तसेच समाजसेविका छाया ताई खंडागळे यांनी सर्वांचे आभार मानले.