ब्रेकिंग न्यूज

किवळे गावातील 8 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आ

19/07/2023 10:30:13  101   अँड. निलेश आंधळे

किवळे गावातील किवळे गावातील 8 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार.....8 विद्यार्थी  शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार.....

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2023 मध्ये किवळे गावातील एकूण 34 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, एकूण 300 गुणांपैकी 230 गुणांचा वर असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती साठी धारक म्हणून उत्तीर्ण केले जाते त्यात किवळे गावातील एकूण 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात 5 मुली आणि 3 मुले आहेत. 

 

*१) ऐश्वर्या किरण साळूंके.... २६०*

*२) राम चांगदेव म्हसे....२५८*

*३) जयेश संतोष शिवलकर... २५६*

*४) तनिष्का प्रकाश म्हसे.... २३८*

*५) तनिष्का बाबाजी बंधाटे ...२३६*

*६) गौरी निलेश म्हसे.... २३४*

*७) आर्यन मच्छिंद्र शिवले.... २३४*

*८) वैष्णवी सुनिल शिवलकर .... २३२*

 

सदर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी *शिक्षिका सौ . शांता बाजीराव राळे* यांनी मार्गदर्शन आणि मेहनत घेतली.

किवळे गावात विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रथमच अशी ऐतिहासिक कामगिरी करण्यात आली म्हणून किवळे गावातील ग्रामस्थ , ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच  आणि सर्व सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य, तसेच सर्व पालक वर्ग यांनी मिळून गावात गुणवंत *विद्यार्थ्यांची आणि मार्गदर्शक शिक्षकांची ढोल ताशांचा गजरात मिरवणूक काढून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ह्या ऐतिहासिक कामगिरी साठी मेहनत घेणाऱ्या शिक्षक,शिक्षिका,मुख्याध्यापक*  सर्वांचा किवळे ग्रामस्थांचा आणि शाळा व्यवस्थापन समिती चा वतीने सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम *गटशिक्षणाधिकारी कोकणे साहेब तसेच शिक्षण विस्तार अधिकारी शेवकरी मॅडम यांचे उपस्थिती मध्ये संपन्न झाला.*

तदनंतर किवळे गावचा  *मुख्याध्यापिका श्रीमती मंगल कानडे मॅडम यांचा देखील निरोप समारंभ* जड अंतःकरणाने मोठ्या थाटामाटात करण्यात आला.