ब्रेकिंग न्यूज

कल्याणकाका आखाडे यांच्या निवडीमुळे माळी समाजाला न्याय :- मयुर वैद्य

16/05/2023 19:22:01  26   उज्वल पाटील

आखाडे यांच्या निवडीमुळे बालमटाकळीत तमाम समाज बांधवांच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

बालमटाकळी/प्रतिनिधी :: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरविण्याचे भाष्य केले होते. त्यामुळे राज्यातील राजकारणात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल होण्याची चर्चा सुरू झाली होती दरम्यान, त्यांनी स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र त्यांचा या निर्णयाला कार्यकर्त्यांनी तीव्रपणे विरोध केला. त्यानंतर पवार यांनी आपला राजीनामा माघार घेत असल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी पक्षात काही बदल करून भाकरी फिरविणार असल्याचेही स्पष्ट केले. व आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्ष पद मराठवाड्याचे भूमिपुत्र तथा सावता परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सावता परिषदेचे जाळे निर्माण करणारे कल्याण काका आखाडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या ह्या निवडीमुळे माळी समाजाला न्याय मिळाला असल्याचे प्रतिपादन सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयुर वैद्य यांनी केले.

           राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सावता परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष कल्याणकाका आखाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करून त्यांना मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात निवडीचे पत्र दिल्याने मंगळवारी दि. १६ मे २०२३ रोजी तमाम समाज बांधवांनी बालमटाकळी गावात फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मयुर वैद्य हे बोलत होते.

           यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयुर वैद्य, सावता परिषदेचे प्रदेश महासचिव गणेश दळवी, प्रदेश उपाध्यक्ष प्रविण गाडेकर, मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, प्रदेश सचिव शरद माने, प्रदेश कोषाध्यक्ष पारस परमार, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. गोपाळ बुरबुरे, मराठवाडा विभाग अध्यक्ष शिवानंद झोरे, मुंबई विभाग संपर्कप्रमुख अशोक माने, मराठवाडा विभाग संपर्कप्रमुख विष्णूपंत खेत्रे, मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप चौरे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष उद्घव भुजबळ, बीड जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, छ. संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव, संभाजीनगर महानगर अध्यक्ष साईनाथ जाधव, ठाणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा भोपळे, राज गाडेकर, तुषार राख, चंद्रकांत जाधवर, संजीव निवडुंगे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.