ब्रेकिंग न्यूज

वन विभाग मंचर व वनविभाग खेड मध्ये लाखोचा भ्रष्टाचार? माहीती लपवण्याचा प्रक

15/05/2023 00:29:05  306   वैभव काळे पाटील

वन विभाग मंचर व वनविभाग खेड मध्ये लाखोचा भ्रष्टाचार?  माहीती लपवण्याचा प्रकार.तर ओतुर वन विभागाला माहीती लपवणे पडले महागात...

वनविभाग खेड व वन‌ मंचर हे माहीती अधिकारात माहिती माघीतली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे दिसत आहे..   माहीती अधिकारात माहीती टाळने ओतुर वन परीक्षेत्र अधिकारी रघतवान यांना  चांगलेच महागात पडले. माहीती अधिकार कार्यकर्ते योगेश लंघे यांनी केलेल्या अपीला वर सुनावणी करताना राज्य माहिती आयोगाने ठपाका ठेवत  जनमाहिती अधिकारी ओतुर यांना   25 हजाराचा दंड. वव अपीली अधिकारी यांना  पण कारवाई ला सामोरे जावे लागले आहे. परंतु  आताच्या सदर अपीला मध्ये अपीली अधिकारी हे जाणीवपूर्वक  अपीला ला लांबणीवर.  व आदेश देण्यात कुचराई करत आहे असे दिसते.  माहीती देण्यास जर टाळाटाळ करण्यात आली तर भ्रष्टाचार झाला आहे असे प्रथम दर्शनी सिद्ध होते असा कोर्टाने एका आदेशात‌ म्हणले आहे. त्या मुळे अर्जदारास माहीती ही लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे काम जन माहीती अधिकारी व अपीली अधिकारी यांचे आहे. परंतु   जन माहीती अधिकारी रौधळ  खेड .व वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर हे माहीती लपवण्यातच दंग असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते श्री योगेश लंघे यांनी सांगितले.  तसेच लवकरच वन मंत्री मुख्य वन संरक्षक पुणे. व‌ मुख्यमंत्री यांना तक्रार करणार‌ असुन. वनविभाग खेड व मंचर  यांनी केलेल्या कामांची व आर्थिक व्यावहाराची व निवीदा न काढताच केलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी म्हणून तक्रार करणार आहे असे त्यांनी सांगितलं. कामे फक्त कागदावरच असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. जर भ्रष्टाचार झाला नाही तर माहीती लपवण्याचा प्रकार का होत आहे. ह्या सर्व प्रकारा मुळे वनविभाग च्या कार्य पद्धती वर मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित राहीले आहे.